Magnet April 25th, 2006

स्फुर्ती….
भटकत राहिलो पोटापायी
दरवेशासारखा
मुक्काम दर मुक्काम
शहर शहर
देशात,… परदेशात
तरीही;
एक गीत गुणगुणतेय
अजुनही
थकलेल्या मनात
एक सुगंध दरवळतोय
अजुनही
खोल अंतरात
एक ज्योत तेवतेय
अजुनही
विझलेल्या हृदयात
गावच्या मातीचा एक कण वाहतोय
अजुनहीस्फुर्ती बनुन माझ्या रोमारोमात…

Trackback URI | Comments RSS

Leave a Reply